म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील विद्यार्थी शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षा एलिमेंटरी (पहिली) व इंटरमिजिएट (दुसरी) परीक्षाला प्रविष्ट झाले होते. त्याचा निकाल नुकताच लागला असून, यात शाळेचा शंभर टक्के निकाल लागला.
सविस्तर वृत्त असे की, शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा दर वर्षी सप्टेंबर महिन्यात होते.मात्र मागील वर्षी कोरोना काळ असल्याकारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली व एप्रिल 2022 ला ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल परवाच लागला. यात शाळेने शंभर टक्के यश संपादन केले आहे.
एलिमेंटरी परीक्षेसाठी सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात मयुरी भोई, खुशी परदेसी, डिंपल पाटील,स्नेहा पाटील यांना “ए” ग्रेड मिळाला आहे.तर साक्षी पाटील,रूपाली जावरे यांना “बी” ग्रेड मिळाला आहे.
इंटरमिजिएट (दुसरी) परीक्षेमध्ये नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात त्यांच्या शंभर टक्के निकाल लागला असून.”A” ग्रेडमध्ये शिंपी रितेश,चौधरी दिव्या,हर्षदा पाटील यांना मिळाला आहे. तर “B” ग्रेड मध्ये सामुद्रे दर्शना, पाटील वैष्णवी,यांना तर “C” ग्रेड मध्ये सामुद्रे शिवम, पानपाटील कल्याणी, वाघ साक्षी,पाटील पूनम यांना मिळाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक नरेंद्र गुरव यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक एस. पी.पाटील, उपमुख्याध्यापक डी. टी. चौधरी, व पर्यवेक्षक सी.जी. पटेल यांनी अभिनंदन केले.