म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा मतदारसंघाचे माजी आमदार कै. डाॅ.नरेंद्रसिंग भगतसिंग पाडवी यांचा पूर्णाकृती पुतळा व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम त्यांचा जन्म दिनी भगदरी ता.अक्कलकुवा येथील गावातील नाल्याटेंबा येथील माध्यमिक विद्यालयाचा प्रांगणात आमदार राजेश पाडवी,आशाताई पाडवी,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी, नागेश पाडवी यांचा हस्ते बसविण्यात आला.
कै.डाॅ.नरेंद्रसिंग पाडवी यांच्या राहत्या घरून त्यांचा पुतळा टाटामॅजिक गाडीवर ठेवून भजनी मंडळांनी भजन,कीर्तन गावुन शोभा यात्रा काढण्यात आली.माध्यमिक विद्यालयाचा प्रांगणात शोभायात्रा आणुन.
बांधण्यात आलेल्या मोठ्या चबुतरा वर आमदार राजेश पाडवी,आशाताई पाडवी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी, पाडवी,नागेश पाडवी यांचा हस्ते विधीवत पूजाअर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक कैलास खोंडे यांनी केले. आमदार राजेश पाडवी यांनी कै. डाॅ.नरेंद्रसिंग पाडवी यांचाशी स्नेह संबध व जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे संबंध किती दृढ हे सांगताना त्यांचे अश्रु दाटून आलेत. नागेश पाडवी यांनी कै. डाॅ.नरेंद्रसिंग पाडवी यांचा जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला.
देवमोगरा माता मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष जर्मनसिंग वसावा यांनीही कै. डाॅ.नरेंद्रसिंग पाडवी यांचा समाज कार्य,जनसेवेची माहीती दिली.उपस्थितांनी कै.डाॅ.नरेंद्रसिंग पाडवी यांना सामुहिक श्रध्दांजली वाहिली. यावेळी देवमोगरा माता मंदिर (गुजरात) ट्रस्ट उपाध्यक्ष जर्मनसिंग वसावा, तळोदा नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी,
माजी नगराध्यक्षा हेमलता डामरे, जि.प.सदस्य किरसिंग वळवी,माजी पंचायत समिती उपसभापती पिरेसिंग पाडवी, माजी पं.स.उपसभापती भाऊराणा, दिनकर पाडवी,रामसिंग वळवी,कानसिंग महाराज, अ.कुवा माजी सरपंच प्रेमचंद जैन, मुख्याध्यापक प्रमोद कोळी,मुख्याध्यापक सुरगणसिंग पाडवी, आर. के. वसावे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.