तळोदा l प्रतिनिधी
तळोदा मुस्लीम यंग सर्कल तर्फे ईद स्नेह मिलन व सन्मान कर्तुत्वाचा कार्यक्रम तळोदा येथील बद्री कॉलोनीत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमा पद्माकर वळवी उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी,माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी , राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी ,कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत माळी ,भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी,ओरंगाबाद खंडपीठातील विधीज्ञ ॲड. सबाहत तारिक काझी,आत्मनिर्भर अभियानचे जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी,आदर्श शेतकरी निसारअली मक्राणी ,
शहादा पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष गौतम जैन अक्कलकुवा जामिया व्यवस्थापक मोलाना हुजेफा गुलाम रंदेरा ,मुस्लीम समाज अध्यक्ष आरीफ शेख नुरा,मोलाना शोएब रझा नुरी ,महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा तथा नगर सेविका अनिता परदेशी ,बांधकाम समिती सभापती हितेंद्र क्षत्रिय,नगर सेवक संजय माळी ,
जितेंद्र माळी ,गौरव वाणी ,अमानोद्दिन फखरुद्दिन शेख,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे ,संदीप परदेशी ,महावितरण चे कार्यकारी अभियंता तिरुपती पाटील ,आसीफ इनायतखा मन्सुरी, धुळे ,भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीये उपाध्यक्ष डॉ.देविदास शेंडे अदी उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी व सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये सर्व धर्म समजची निर्मिती व्हावी यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमात कोरोणा काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांच्या तसेच प्रशानातील काही अधिकाऱ्यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.
पोलीस उपविभागीय अधिकारी सभांजी सावंत, तहसीलदार गिरीश वखारे, ओरंगाबाद खंडपीठातील विधीज्ञ ॲड. सबाहत तारिक काझी, पत्रकार रमाकांत पाटील, सूर्यभान राजपूत डॉ.राजेश वसावे , डॉ.रोशन भंडारी, तालुका वैद्यकीय अधिकारी तळोदा डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.शिरीष शिंदे, डॉ.गौरव तांबोळी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग उत्तीर्ण डॉ.अर्जुन पावरा यांच्या सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आले.
या वेळी माजी आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले कि, आमच्या शहराची परंपरा शांतताप्रिय असून कधीच दोन समाजत तेढ निर्माण झाला नसून काही अफ्वाद वघळता तळोदा शहराचे नाव पूर्ण जिल्यात आहे.
ॲड. सिमा वळवी म्हणाल्या कि, तळोदा शहर हे शांतताप्रिय असून तळोदा येथील मुस्लीम यंग सर्कलतर्फे ईद स्नेह मिलन व सन्मान कर्तुत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याना मी शुभेच्छा देते व कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांच्या तसेच प्रशानातील काही अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देते असे सांगितले.
या कार्यक्रमांचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मुकेश कापुरे यांनी केले कार्यक्रमासाठी मुस्लीम यंग सर्कल चे मुबीन मणियार,इम्रान लियाकत शेख ,अक्रम पिंजारी,इद्रीस सैय्यद डॉ.आजम मन्सुरी ,मलक अश्पाक ,
रफीक सुलतान शेख ,रईस कुरेशी ,मोहसीन कुरेशी इम्रान मणियार,माजी नगर सेवक कलीम अन्सारी,आसीफ याकुब शेख ,शोएब पठाण ,आदिल दिलावर शेख ,गुड्डू मणियार,कामील याकुब शेख ,मुसा जलील शेख युसुफ मिर्झा,रफीक भिका मणियार आदींनी परिश्रम घेतले.