नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील देहली प्रकल्पाचे घळभरणीचे काम अंतिम टप्प्यात असून 15 ऑक्टोंबर 2022 अखेर धरणात पूर्ण क्षमतेने जलसाठा निर्माण होणार असल्याने
देहली प्रकल्पावरील सर्व प्रकल्पग्रस्त मच्छिमारांनी एकत्रीत येवून भूजलाशयीन मच्छिमार संस्था नोंदणीचे प्रस्ताव तयार करुन 13 जून 2022 पर्यंत सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) ,शासकीय डेअरी, चक्करबर्डी रोड, धुळे येथे सादर करावे.
असे आवाहन सहायक आयुक्त मत्सयव्यवसाय किरण पाडवी यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.