म्हसावद l प्रतिनिधी
धुळे विभागातील शहादा आगाराला दि. 23 मे 22 रोजी धुळे विभागात सर्वात जास्त 13 लाख रुपये उत्पन्न विभागात प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
प्रति किलोमीटर आगाराचे उत्पन्न 38 रुपये असून पस्तीस हजार पस्तीस हजार सातशे दोन किलोमीटर बस धावली. विभागात भारमान 60 टक्के पेक्षा जास्त आहे.
विभागात जास्तीत जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे शहादा आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी आणि आगारातील अधिकाऱ्यांनी शहादा बस आगारातील वाहक, चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, यांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला.
शहादा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी,प्रवाशी संघटनाचे पदाधिकारी यांनी प्रवास्यांना बस ने प्रवास करण्याचे आवाहन केले आणि परीश्रम घेतले. लांब पल्ल्याच्या गाड्या, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासी यांच्या मागणीप्रमाणे सुरू केल्या मुळे उत्पन्न वाढीस हातभार लागला.
आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिल्यामुळेच शहादा बस आगाराने हे उत्पन्न मिळवले असे योगेश लिंगायत आणि संजय कुलकर्णी,अधिकारीवर्ग यांनी आगारातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एस एम शेख, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश पावरा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मिर्झा, आगार लेखाकार सुरेश पाटील, विलास पाटील, सप्रे, सतीश चव्हाण, शरीफ पिंजारी,आदि उपस्थित होते. याप्रसंगी महामंडळ प्रणित प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दत्ता वाघ, सचिव प्रा. रवींद्र पंड्या उपाध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी आगारातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अशीच प्रगती शहादा बस आगाराची भविष्यातही राहो, प्रवाशांच्या सेवेसाठी आणि प्रवासी मागणीप्रमाणे बस सेवा पुरवली जावो अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
विभागात प्रथम येण्याचे सर्व श्रेय वाहक, चालक आणि आगारातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे आहे. त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे विभागात जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला मिळाले. याबद्दल सर्वांना मनस्वी आनंद झालेला आहे.
योगेश लिंगायत,( शहादा आगार व्यवस्थापक)
शहादा आगारातील वाहक आणि चालक यांत्रिकी विभागातील सर्व कर्मचारी प्रशासन अधिकारी वर्ग, आगार प्रमुख बस स्थानक प्रमुख,निरीक्षक यांचे टीमवर्क चांगले असल्याने विभागात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले याचे श्रेय सर्वांनाच जाते. सर्व अभिनंदनास पात्र आहेत
प्रा. ज्ञानी कुलकर्णी. उपाध्यक्ष प्रवासी संघटना.
शहादा आगार प्रमुख, स्थानक प्रमुख, प्रशासकीय वर्ग, सर्व वाहक, चालक यांनी घेतलेले कठोर परिश्रम, यांत्रिकी विभागाने बसेस सुस्थितीत ठेवल्याने पूर्ण क्षमतेने सर्व सर्वांनी सहाय्य केले. सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे.
प्रा. रवींद्र पंड्या (सचिव प्रवासी संघटना)








