मुंबई l
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.
याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल.