Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
May 20, 2022
in सामाजिक
0
जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला स्टेट बँक इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक सुरजितकुमार सहा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक भारती ठाकूर आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022 साठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन देवून 100 टक्के खरीप कर्ज वाटप होईल याकडे बँकेने विशेष प्रयत्न करावे.

यासाठी बँकेने अधिकाधिक पीक कर्जाचे मेळावे घ्यावेत. अधिकाधिक वनपट्टेधारकांना पीक कर्जाचे वाटप करावेत. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरण राहीलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम त्वरीत पुर्ण करावे.

दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी भागात बँक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. या भागातील बॅकेस येणाऱ्या वीज व इंटरनेटची समस्या सोडविल्या जातील.

बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना, मुद्रा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी.

श्री.जयंत देशपाडे म्हणाले की, खरीप हंगामासाठी जिल्ह्यास 603 कोटी 41 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून आज पर्यंत 160 कोटी 4 लाख रुपयाचे पीक कर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष

Next Post

आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

Next Post
आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

आदिवासी समाजातुन धर्मांतर केलेल्यांचे आरक्षण सह सर्व सवलती रद्द करा : ॲड.हिम्मत तावड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add