खापर l प्रतिनिधी
लीड स्कुलया बहु नामांकित संस्थेच्या वतिने संपूर्ण भारतात पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील इरा इंटरनेशनल शाळेतील विद्यार्थी सूरज सुनील पवार सुपर १०० मध्ये पात्र ठरला आहे.
विद्यार्थ्यांना १०वी सी.बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत अव्वल होण्यासाठी मार्गदर्शन करणारा एक विशेष कार्यक्रम लीड कडुन आयोजित केला होता.त्यात संपूर्ण भारतात ४ हजारहुन अधिक शाळेनी व ३ लाख पेक्षा अधिक विद्यार्थींनी भाग घेतला होता.
सदरच्या परीक्षेत खापरच्या इरा इंटरनेशनल शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यानी नोंदविला होता. ४ मे २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली होती व त्याचा निकाल आज रोजी जाहीर झाला आहे. त्यात सूरज सुनील पवार सुपर १०० मध्ये पात्र ठरला आहे.
लीडस्कुल संस्थेच्या वतीने घेतलेल्या विशेष कार्यक्रमात सुरज पवार उत्तीर्ण झाल्यामुळे त्याला १० वी.सीबीएसई परिक्षेत संबंधीत पुढील मार्गदर्शन आय.आय.टी.तील अनुभवी तज्ञ करतील.या यशस्वी विद्यार्थ्याचे मार्गदर्शक शिक्षक सोनल महाजन,अरविंद पाडवी,अजय वळवी,मनोहर लोहार व अश्विन सोनार आदी करत होते. तर शाळेचे मुख्याध्यपक निलेश अहिरे व संस्थेचे अध्यक्ष योगेश सोनार यांनी विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीपासुनच आम्ही संपूर्ण गुणवत्ता पूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे, शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम असो किंवा विद्यार्थ्यांची कृतिशिलता यावर भरपूर मेहनत घेत आलो आहे. कोरोना सारखी भयंकर परिस्थितीत देखिल दर्जेदार शिक्षण देनारी आमची ईरा इंटरनेशनल स्कूल ही संपूर्ण जिल्यात प्रख्यात होती आणि लीडस्कूल सारख्या नामांकित सुपर 100 उपक्रमात संपूर्ण भारतात उत्कृष्ट प्रदर्शन करनेही खरोखर मोठी बाब आमच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा तसेच या माघिल परिश्रम घेणारे आमचे सुपर शिक्षक त्यांचे ही कौतुक करावे तितके कमीच आहे. वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या पालकांचे ही अभिनंदन.
योगेश राजेंद्र सोनार, संस्था अध्यक्ष इरा इंटरनेशनल स्कुल, खापर
संपूर्ण भारत भर लीडस्कूलने सुपर १०० परीक्षा घेतली त्यात भारतातील ४ हजार नामांकित शाळेंनी भाग घेतला दिल्ली , मुंबई , पुणे, चेन्नई येथिल विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्या पहिल्या दहा मध्ये आपली ईरा इंटरनेशनल स्कूल खापरचे नाव येणे ही खूप गौरवाची गोष्ट आहे मार्गदर्शन करणारे शिक्षक हे त्या मागील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्या परिश्रम मुळेच आमचे विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकाविता .
निलेश पाटिल, मुख्याध्यापक इरा इंटरनेशनल स्कुल, खापर