नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील उंटावद गावाच्या शिवारातील गोमाई नदी पात्रातून ट्रॅक्टर अज्ञात चोटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हेमंत वाघ यांच्या मालकीचे दोन लाख रूपये किंमतीचे ट्रॅक्टर (क्र.एम.एच.४१ ए.ए.-४४८९) हे शहादा तालुक्यातील उंटावर गावाच्या शिवारातील गोमाई नदीमध्ये चेकडॅमचे काम चालू असतांना
अज्ञात चोरटयाने ट्रॅक्टर लंपास केले. याप्रकरणी यश हेमतवाल रा.नेहरूनगर (धुळे) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द ३८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रमण वळवी करीत आहेत.