नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात अज्ञात चोरटयाने एकाच्या खिशातून २२ हजाराची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेलया माहितीनुसार, अक्कलकुवा गावातील खुशल फर्निचर या दुकानासमोरून बाज्या आरशी वसावे हे जात असतांना अज्ञात इसमाने त्यांच्या पँडच्या मागच्या खिशात हात टाकून २२ हजार रूपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी बाज्या आरशी वसावे रा.चिवउतार (ता.अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई रितेश राऊत करीत आहेत.