नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्द (शनिमांडळ) येथील आदिवासी समाजातील सुनीताबाई वन्या भिल या एका हाताने अपंग आहेत.
तसेच आज पर्यंत त्यांच्या कुटुंबाकडे रेशन कार्ड, अपंग सर्टिफिकेट नव्हते यामुळे त्यांना संजय गांधी निराधार सारख्या विविध शासकीय योजनांचा देखील लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती.
ही अडचण लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत,भाऊसाहेब कोळी यांनी सदर महिलेला अपंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड मिळून दिले,सदर कुटुंबाला नवीन रेशन कार्ड मिळाल्याने मोफत धान्य मिळणार आहे,
तसेच म. ज्यो.फु.योजने अंतर्गत दवाखान्यात देखील दीड लाख पर्यंत खर्च माफ असेन, यापूर्वी सदर कुटुंबाने विकत धान्य घेऊन आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले आहे.
व कुटुंबप्रमुख अपंग महिलेला कायमस्वरूपी अपंग सर्टिफिकेट मिळाल्याने त्यांना यापुढे संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ मिळवून दिला जाणार आहे.
ग्रामीण भागातील आदिवासी समाज कशाप्रकारे शासकीय योजनांपासून किंवा लाभापासून वंचित असतो याचेच हे उदाहरण आहे. पहिल्यांदाच वरील कागद पत्र मिळाल्याने सदर आदिवासी कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
शासनाने अशा वंचित घटकांचा सर्वे करून घरपोच लाभ द्यावा अशी अपेक्षा गावातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.