Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी, स्वताच्या रक्ताने लिहून दिले निवेदन

team by team
May 19, 2022
in सामाजिक
0
छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी, स्वताच्या रक्ताने लिहून दिले निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेने शहरात अनेक राष्ट्र पुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले आहेत. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणांची बलिदान देऊन देव, देश, धर्म जीवंत ठेवला अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नंदुरबार शहरात व्हावा अशी सर्व शिवशंभू प्रेमींची इच्छा आहे.

तरी हा पुतळा शहरातील मध्यवर्ती ठिकाण नवीन नगर पालिका / नाट्य मंदिर आणि स्व. श्री भटेसिंहभैय्या रघुवंशी उद्यान यामधील रिकामी जागा , श्रीस्वामी समर्थ केंद्र शेजारील जुने उद्यान याठिकाणी उभारावा या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समिती आणि शिवशंभू भक्तांनी पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले.

छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी स्वतःरक्ताने निवेदन लिहून शिवशंभू भक्तांचा उपस्थितीत मुख्याधिकारी यांना दिले.

सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी धर्मनिष्ठा आणि स्वराजनिष्ठा सोडली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्र संपूर्ण विश्वासाठी आदर्श आहे.

शहरातील नागरिकांना छ. संभाजीराजे आदर्श जीवनचरित्रातुन आदर्श नागरिक घडावे यासाठी नंदुरबार शहरात छ. संभाजीराजे यांचे पुतळा होणे आवश्यक आहे. पुतळ्याचा अवतीभोवती छ. संभाजीराजे यांचा जीवन चरित्रविषयी शिल्प निर्माण करावे व स्मारकाचा अग्रस्थानी छ संभाजीराजे यांची राजमुद्रा लावावी.

तसेच छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेत ठराव करून निधीची तरतुद करून स्मारक उभारावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर हिंसेससचे नरेंद्र पाटील, हभप रामकृष्ण महाराज, मराठा क्रांती मोर्चाचे नितीन जगताप, क्षत्रिय मराठा पंच मंडळाचे हरीश हराळे, आर एस एस चे हर्षद पत्की, विक्रम रघुवंशी, प्रमोद मराठे, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, विशाल सावळे माळी, गणेश राजपूत, मयूर चौधरी, पंकज डाबी आदी शिवशंभू भक्त उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये महावितरणचे आवाहन

Next Post

हिंदू खाटीक समाजातील सर्व जातींना एकाच प्रवर्गातून आरक्षण व सवलती देण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add