म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ शहादा व जायन्ट्स सहेली ग्रुप शहादा यांनी 2020 व 2021 या काळात सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम केल्यामुळे फेडरेशन 2 अ चे अध्यक्ष अनुपकुमार जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन नाशिक येथील चिंतामणी मंगल कार्यालयात गौरवण्यात आले.
सन 2020 व 2021 या काळात शहादा ग्रुपने अध्यक्ष भुषण बाविस्कर,सचिव प्रमोद सोनार व सहेली अध्यक्षा दिपाली बाविस्कर,सचिव आशा चौधरी यांचा कार्यकाळात वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबीर,दमा शिबीर,,प्लास्टिक सर्जरी कॅम्प ,अवयव दान जनजागृती,कुकलटपाडा येथे श्रमदान,
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मास्क वाटप,व्यसनमुक्तीसाठी जनजागृती, पर्यावरण साठी जनजागृती वृत्तपत्र विक्रेते, डॉक्टर, शिक्षक,परिचारीका यांचा सत्कार, असे विविध उपक्रम घेऊन नाव लौकिक मिळविला म्हणुन समानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जायन्ट्स इंटरनॅशनलचे विश्वउपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, फेडरेशन 2 अ चे अध्यक्ष अनुपकुमार जोशी फेडरेशन 2 अ चे माजी अध्यक्ष डॉ संतोषकुमार मिश्रा, स्पेशल कमिटी मेम्बर रविंद्र जमादार ,गोविंदभाई पटेल,बाबुराव बगाडे,डि एल जाधव,सचिव भिमलिंग लिंभारे आदी उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना शहादा येथील फेडरेशनच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, माणक चौधरी कैलास भावसार, माधव पाटील, गणेश पाटील, संजय सोनार, प्रमोद सोनार आदी उपस्थित होते.