तळोदा l प्रतिनिधी
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवार सकाळी तळोदा शहरातील आंबेडकर नगर मध्ये असणाऱ्या समाज मंदिरात तर संध्याकाळी स्मारक चौकात सामूहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी उपस्थितांना खीरदान करण्यात आले.
जय भिम नवयुग मंडळ फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, ब्लू टायगर बॉईज,लहुजी वस्ताद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी समाज मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव उद्धव पिंपळे, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे हंसराज महाले,जयभीम नवयुवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शिंदे,सिद्धेश्वर गायकवाड यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी मोठया संखेने बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
दरम्यान, संध्याकाळी तळोदा येथील स्मारक चौकात शहरातील सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांच्या उपस्थितीत सामुहिक वंदनेचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक दलितमित्र पुरस्कृत दादाभाई धोडरे होते.त्यांच्या हस्ते भगवान तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर हंसराज महाले यांनी त्रीशरण,पंचशील व बुद्धवंदना घेतली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुभास शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाला महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष केदार,अमोल पाटोळे, प्रा.सुनील पिंपळे,महिला दक्षता समितीच्या सदस्या व महाराष्ट्र अंनिसच्या महिला सहभाग कार्यवाह जयश्री महाले, नगरपालिका अधिक्षक गजानन सावरे, महेंद्र सामुद्रे,राहुल जावरे, नितिन गरुड,आदींसह मोठया संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
यशस्वितेसाठी सुभाष शिंदे, प्रवीण नरभवर , संदीप जावरे ब्ल्यू टायगर बॉईज चे सुनील खैरनार,सिद्धार्थ नरभवर , राकेश सावळे,जितू तिजविज,कपिल खैरनार ,शरद सावळे, राहुल बर्डे,संघप्रिय नरभवर , सुमित नरभवर, अविनाश सुरवाडे , यश पानपाटिल, महेंद्र अहिरे,रोहित अहिरे,स्वामी शिंदे, भोलू शिंदे, पंकज बेडसे,भरत पानपाटील,जीभाऊ अहिरे आदींनी परिश्रम घेतले.