अक्कलकुवा l प्रतिनिधी
प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी महाराजा की आज्ञानुवर्तिनी पार्श्व मणि तीर्थ प्रेरिका गच्छ गणिनी प.पू. साध्वी श्री सुलोचनाश्रीजी म.सा. यांचा सुशिष्या प.पू. साध्वी श्री प्रियसौम्यांजनाश्रीजी म.सा आदि ठाणा 3 यांचा पावन निश्रेत
अक्कलकुवा येथील श्रीमती पंखाबाई जसराजजी चोपडा आराधना भवन येथे त्रिदिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 6 वाजेला जैन आराधना भवन येथून श्री जिनकुशलसूरि दादावाडी पर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. दादावाडी येथे सोमवती पौर्णिमा निमित्ताने सामूहिक गुरु इकतीसा जाप करण्यात आला.
तसेच नवकारसीचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. पश्च्यात शिबिराचे समारोप कार्यक्रम श्री जिनकुशलसूरि दादावाडी येथील प्रवचन हॉल मध्ये संपन्न झाला.
यावेळी प.पू. साध्वी श्री प्रियसौम्यांजनाश्रीजी म.सा यांचा द्वारे मंगल पाठाने कार्यक्रमाची शुरुवात करण्यात आली.
यावेळी राजेद्र डागा, मंदा बोहरा, शोभा भंसाली, उर्मिला भंसाली, ॲड. गजेंद्र भंसाली, महेंद्र डागा, प्रवीण कोचर, खुशी डागा, मोक्षा डागा, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, श्री वासुपूज्य पवित्र महिला मंडल तर्फे नाटिका प्रस्तुत करण्यात आली तसेच खुशी डागा, नीती भंसाली, दृष्टि भंसाली यानी सामूहिक गीत गायण केले.
सदर शिबिरात घेण्यात आलेल्या परीक्षेत लहान वयोगटात प्रथम क्रमांक मनित डागा व दृष्टि भंसाली, द्वितीय मंथन गुलेच्छा व तृतीय ऊर्जा ललवानी व दक्ष श्रीश्रीमाल तर मोठे वयोगटात प्रथम क्रमांक शोभा भंसाली, द्वितीय मंदा बोहरा, तृतीय कुशल गुलेच्छा, खुशी डागा, मोक्षा डागा यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
तसेच अपूर्वा झाबक, ऊर्जा ललवानी, मोक्ष झाबक यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला, तसेच शिबिरात सहभाग घेतल्याने सर्व शिबीरार्थी यांना ही पारितोषिक देण्यात आले.
सदर ह्या शिबिराचे संयोजक मध्ये राजेंद्र राणुलाल डागा, पारसमल तेजमल गुलेच्छा, नरेशचंद मुकनचंद गुलेच्छा हे होते.
तर समारोप कार्यक्रम प्रसंगी नवकारसी व दादा गुरुदेव पूजनचे संयोजक राजेंद्र राणुलाल डागा, मांगीलाल भवरलाल संकलेचा, नरेशचंद मुकनचंद गुलेच्छा, सौ. कमलाबाई जेठमल गुलेच्छा, मदनचंद राणुलाल कोचर हे होते. त्यांचा ही सन्मान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात गौतमचंद डागा, महावीर डागा, मनोज डागा, महेंद्र भंसाली, पिंटू डागा, अशोक चोपडा, दिनेश डागा आदि उपस्थित होते.
सदर शिबिर यशस्वीतेसाठी दिलीप कोचर, शुभम भंसाली, दिपक डागा, कीर्तिकुमार गुलेच्छा, कुशल गुलेच्छा, श्री वासुपूज्य पवित्र महिला मंडल यांनी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभम भंसाली यांनी केले.