Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव व तळोदा तालुक्यातील काही भागात जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के

team by team
August 7, 2021
in राष्ट्रीय
0

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातील धडगाव व तळोदा तालुक्यात आज दि.७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के  जाणवले . अक्राणी तालुक्यातील धनाजी खुर्द , उम्राणी बु , सूर्यपूर , होडीपाडा तसेच तळोदा तालुक्यातील बोरद , खरवड , प्रतापपूर भागात भुकंपाचे धक्के जाणवले . ३.२ रिश्टर स्केलची नोंद करण्यात आली आहे . भुकंपाचा केंद्रबिंदू सरदार सरोवर पासून ५६ किलोमीटरवर असल्याची नोंद करण्यात आली आहे .
नंदुरबार जिल्हयात सरदार सरोवरमुळे अधुनमधून भुकंपाचे धक्के जाणवत असतात.आज सायंकाळी ४.४५ च्या सुमारासदेखील जिल्हयातील अनेक गावांमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले . अक्राणी तालुक्यातील धनाजी खुर्द येथे ३.२ रिश्टर स्केल भुकंपाची नोंद करण्यात आली आहे . तसेच अक्राणी तालुक्यातीलच उम्राणी बु , उम्राणी खूर्द , सूर्यपूर , होडीपाडा , आमला , आचपा , राडीकमल , तळोदा तालुक्यातील बोरद , खरवड , प्रतापपूर , तहावद भागातही दोन सेकंद भुकंपाचे धक्के जाणवले . यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती . अनेकांनी एकमेकांना दुरध्वनी , मोबाईलद्वारे संपर्क करुन भुकंपाची माहिती दिली . या भुकंपाचे केंद्र हे सरदार सरोसर प्रकल्पापासून ५६ किलोमीटर असल्याची नोंद गांधीनगर येथील इन्स्टीटयुट ऑफ सेस्मॉलॉजीकल रिसर्चने केली आहे . या भुकंपामुळे कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी झालेली नाही . त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये तसेच कुठल्याही अफवांना बळी न पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव- मोलगी रस्त्यावर प्रतिबंधित विदेशी मद्य , बिअर व चारचाकी वाहनासह ५ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

अखेर गाडी सोडून पळणाऱ्या रेशन मालाची चोरटी वाहतूक प्रकरणी गुन्हा

Next Post
गावकर्‍यांनी पाठलाग करतात रेशन दुकानदार गाडी टाकुन फरार,पुरवठा विभाग कारवाई कधी करणार नागरीकांचा सवाल

अखेर गाडी सोडून पळणाऱ्या रेशन मालाची चोरटी वाहतूक प्रकरणी गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add