म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचे अवचैत्य साधून’ शहादा येथील नगरपालिका व पंचायत समिती येथे ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बार्टी) अंतर्गत विविध योजनांच्या जागर कार्यक्रम प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.त्यात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
प्रशासकिय प्रांगणात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहनास मानवंदना देण्यात आली.
यावेळी बार्टीतील तालुका समन्वय हेमंत करनकाळे , जयश्री कढरे, यांनी समाज कल्याण अंतर्गत विविध योजनाची सविस्तर माहिती देत तळागाळातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळून देण्याचा मानस असल्याचे बोलून दाखवले,
यावेळी दिव्यांग कल्याण योजना व सामाजिक न्याय समता विभाग बार्टीच्या विविध प्रकारच्या योजने विषयी घडीपुस्तिकेच्या माध्यमातुन वाचन करुन जास्तीत जास्त नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले,
याप्रसंगी शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे, नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश सिनारे सह, इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.