म्हसावद l पुलायन जाधव
शहादा तालुक्यातील वडाळी – काकर्दा रस्त्यावर एका अनोळखी 35 वर्षीय इसम मृत्यू अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांकडून सदर मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वडाळी – काकर्दा रस्त्यावरील अनुसयाबाई ज्ञानेश्वर देवरे यांचे गट नं.384 मधील शेतातील दक्षिणेकडील बांधाजवळील असलेल्या चारित एक 35 वर्षीय अनोळखी इसम मृत्यू अवस्थेत व बेवारस पणे आढळून आला. या घटनेची खबर सारंगखेडा पोलीस ठाण्यात वडाळी येथील पोलीस पाटील गजेंद्रगिरी गोसावी यांनी दिली असून घटनास्थळी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व त्यांचे कर्मचारी दाखल झाले. तसेच सदर घटनेचा पंचनामा करून बेवारस प्रेत सारंगखेडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.मात्र मयताचे नाव , गाव माहिती नसून सारंगखेडा पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. सदर घटनेची नोंद सारंगखेडा पोलीस ठाण्यात 174 प्रमाणे दाखल करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत. तर परीसरात या अनोळखी इसमाचा मृत्यू उष्माघातामुळे झाली असल्याची चर्चा केली जात आहे.
मयत इसमाची ओळखीचे निशाण
बांधा सडपातळ ,उंची साधारण 5 फूट, रंग सावळा , केस काळे पांढरे कुरळे झालेले, दाढी बारीक अंगात निळ्या रंगाचे बारीक लाइनिंग फुल बाह्यांचे शर्ट निळसर सफेत जीन्स तसेच उजव्या हातावर जुनी जखम असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.








