Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात राजकीय हस्तक्षेप थांबवून प्रस्तावित विकासाकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, भाजपा नगरसेवकांचे पालिका मुख्याधिकाऱ्याना निवेदन

team by team
May 4, 2022
in राजकीय
0
नंदुरबार शहरात राजकीय हस्तक्षेप थांबवून प्रस्तावित विकासाकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, भाजपा नगरसेवकांचे पालिका मुख्याधिकाऱ्याना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावापासून ते चैतन्य चौक व मंगळ बाजारापर्यंत गटारीचे सांडपाणी नेहमी रस्त्यावर वाहते. यामुळे वाहने घसरून किरकोळ अपघात होत असून डॉ.हेमंत चौधरी यांच्या दवाखानापासून ते साक्री नाक्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असे असताना याकामांकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असून पावसाळ्यापूर्वी ही कामे तात्काळ करण्यात यावी. तसेच सदर कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने सदर कामांना उशीर होत आहे. म्हणून राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा. अन्यथा भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी दिला आहे.
याबाबत नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावापासून ते थेट मंगळ बाजारापर्यंत गटारीचे सांडपाणी नेहमी रस्त्यावर वाहते. या सांडपाण्यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडत आहेत. तर परिसरातील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागते. डॉ. हेमंत चौधरी यांच्या दवाखाना पासून ते साखरी नाक्यापर्यंतच्या रस्त्याची ही दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात भाजपाच्या नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा करून पालिका प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. परंतु अद्यापपर्यंत त्या परिसरात भूमिगत गटार व थ्रीमिक्स सिमेंट रस्त्याची निविदा निघून दोन महिने झाले आहेत. मात्र या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने सदर कामांना विरोध विलंब होत असल्याचाही आरोप भाजपा नगरसेवकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी सदरची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. तसेच या कामांमधील राजकीय हस्तक्षेप थांबविण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नंदुरबार नगरपालिकेतील विरोधी पक्षनेता तथा भाजपाचे नगरसेवक ॲड. चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, नगरसेवक आकाश चौधरी, नगरसेविका संगीता वसईकर, नगरसेविका सिंधुबाई माळी आदींनी निवेदनातून दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

Next Post

नंदुरबार शहरात दिवसाढवळया घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

Next Post
नंदुरबार शहरात दिवसाढवळया  घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

नंदुरबार शहरात दिवसाढवळया घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add