Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ, पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

team by team
May 2, 2022
in राजकीय
0
स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ, पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

नंदुरबार l प्रतिनिधी
ऑलिंपिकच्या धर्तीवर बनवण्यात आलेल्या पालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले .
नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना जलतरणची सोय व्हावी. जलतरण स्पर्धेत जिल्ह्यातील युवक राष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेच्या माध्यमातून धुळे रस्त्यावर स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव साकारण्यात आलेले आहे. या तलावाचे उद्घाटन मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनद्वारे केले होते. दोन वर्षांपूर्वीच जलतरण तलाव बांधून तयार करण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे शासनाचे निर्बंध आल्यावर तलाव सुरू होऊ शकला नाही.
सध्या कोरोनाचा परिस्थिती नियंत्रणात असल्याने तसेच शासन निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी अमोल बागुल, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे,गजेंद्र शिंपी, जगन माळी,माजी नगरसेवक दीपक कटारिया, नगर अभियंता विजय पाटील, अशोक वसंत चौधरी, वर्ड ऑफ स्पोर्ट शिक्षण सांस्कृतिक संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिकांनी जलतरण तलावाच्या लाभ घेण्याचे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

Next Post
निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add