Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक तयारी करा, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

team by team
August 5, 2021
in आरोग्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आवश्यक आरोग्य सुविधांची व्यवस्था करण्यात यावी आणि अपेक्षित ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.नारायण बावा आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, खाजगी रुग्णालयात देखील ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा. ऑक्सिजनबाबत आवश्यक नियोजन करण्याबाबत रुग्णालयांना सूचना देण्यात याव्यात. नवापूर येथे अधिकच्या ऑक्सिजन बेड्सचे  नियोजन करावे.  जिल्हा क्रीडा संकुलाच्या ठिकाणीदेखील अधिक प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे.
 कोरोना बाधित आढळल्यानंतर संपर्क साखळी शोधण्यावर विशेष भर द्यावा. रेल्वे आणि बस स्थानकाच्या ठिकाणी अँटीजन चाचण्यांसाठी पथक नेमण्यात यावेत. शाळेतील शिक्षक अथवा विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्यास शाळा बंद ठेवून शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आवश्यक पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. कोविड केअर सेंटरमधील बेड्सची सुविधा, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना चाचण्या आदी विविध  विषयांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धर्मादाय व सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन

Next Post

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Next Post
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026
रविवारी नंदुरबार येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन

रविवारी नंदुरबार येथे हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन

January 17, 2026
नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार जिल्ह्यात माहिती रथयात्रेचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शुभारंभ

January 17, 2026
गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

January 14, 2026
सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

January 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add