नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली ता.जि.नंदुरबार येथे सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता 6 वीच्या वर्गात 40 विद्यार्थींनी तसेच इयत्ता 7 ते 10 वीच्या रिक्त जागासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
शासकीय निवासी शाळेत विद्यार्थीनींना शिक्षण व निवासाची व्यवस्था निशूल्क उपलब्ध असून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनींनी निवासी शाळेत प्रवेश घ्यावा, प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी (9423720810 ) वर संपर्क साधावा. असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती एम.ए.बोरसे यांनी केले आहे.










