म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलोणी येथिल एस ए मिशन खाजगी प्राथमिक मराठी शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एस ए मिशन इंग्रजी मिडियम चे मुख्याध्यापक एस.पी.नाथानी, शहादा चर्चचे पाश्चर इन्चार्ज रेव्ह.आनंद पटेल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल सोमवंशी यांनी केले.यावेळी रेव्ह.आनंद पटेल यांनी देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रातील जनतेसाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उषा जाधव, मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, कुणाल सोमवंशी, सोनाली पाकळे, नितिन गलराह,संदिप पाटील, इंग्रजी मिडियमचे शिक्षक संजय अहिरे,शेख,श्वेता गलराह, मृणालिनी भोई,अर्चना गोडबोले,भारती ठाकूर,अमित पटेल,मनिष सुतार, बेंजामिन वळवी आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.










