नंदूरबार l प्रतिनिधी
देशात आणि महाराष्ट्र इतर राजकीय पक्षांनी जातीयवादी भूमिका घेत समाजावर विपरीत परिणाम घडून त्यातून होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या वळणावर असणाऱ्या महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने नंदुरबार शहरात शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यात वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुणजी रामराजे महिला आघाडीच्या पुष्पाताई वानखेडे गवई गट चे आप्पा वाघ युवा आघाडीचे सुनील भाऊ सूर्यवंशी दिनेश भाऊ समुद्रे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधूनसमाजात दुही माजवणाऱ्या व त्यातुन आपल्या स्वार्थासाठी भोंगा हनुमानचालीसा पठण. या सारख्या धार्मिक विषयावर बोलून राजकीय पोळी शेकणाऱ्या पक्षाच्या भूमिकांमूळे सणासुदीच्या दिवसात शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी.उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे, महिला आघाडीच्या अद्यक्ष पुष्पा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता मार्चच आयोजन करण्यात आले होते.यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.










