Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पालिकेला पथदिव्यांसाठी विविध योजनेतून ७ कोटी ७४ लक्ष रूपयांचा निधी मंजुर

team by team
May 1, 2022
in राजकीय
0
नवापूर पालिकेला पथदिव्यांसाठी विविध योजनेतून ७ कोटी ७४ लक्ष रूपयांचा निधी मंजुर

नवापूर l प्रतिनिधी
नगरपालिकेच्या हद्दीतील चारही दिशेतील रस्ते हे महानगरातील रस्त्याप्रमाणे “एलईडी’ने झळकणार आहे. नवापूर शहर,मुख्य रस्ते, नगर, काॅलनी गल्लीबोळातील रस्ते एलईडी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघेल.यासाठी नवापूर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील सर्व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने आमदार शिरीषकुमार नाईक यांनी आदिवासी विकास मंत्री ॲड के.सी.पाडवी यांच्या मदतीने नवापूर नगरपालिकेला पथदिव्यांसाठी विविध योजनेतून तब्बल सात कोटी ७४ लक्ष ६५ हजार रूपये मंजूर करून दिले आहे.
या दिव्यांमुळे विजेची बचत होणार असून पर्यायाने खर्चही कमी होईल “एलईडी’ पथदिवे बसविण्याचे काम त्वरित सुरू करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी दिली आहे. नवापूर शहरात पूर्वी लावण्यात आलेले पथदिवे अधिक उंच असल्याने त्याचा प्रकाश रस्त्यावर पूर्णक्षमतेने पडत नाही.त्यामुळे पथदिवे असून देखील अंधकार दिसून येतो.अनेक वेळा जुनाट केबलमुळे पथदिवे बंद असतात नवीन पथदिवे आल्याने या समस्या दूर होणार आहेत. नागरिकांनी देखील नवापूर नगरपालिकेने विविध योजनेतून सात कोटी ७४ लक्ष रुपये निधी मंजूर झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. नवापूर शहरात मोठ्या प्रमाणात पथदिवे लावण्यात येणार असून त्याचं मेंटेनन्स देखील वेळेवर करणे गरजेचे आहे.अनेकदा पथदिवे बंद असून लवकर दुरुस्त केली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी अनेक वेळा पालिकेत केले आहे. सदर पथदिवे आधुनिक असून यात बिघाड होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.बिघाड झाल्यास तात्काळ पथदिवे दुरुस्त केले जातील. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासन तत्पर असल्याचे नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी सांगितले आहे.

या योजनेअंतर्गत पथदिवे दिले
नगरोत्थान योजनेअंतर्गत एलईडी इलेक्ट्रिक दिव्यांसाठी २ कोटीचा निधी मंजुरी, वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत एलईडी इलेक्ट्रिक लाईट २ कोटीचा निधी, लेखाशीर्ष योजनेअंतर्गत १५६ सोलर पथदिवे
हायमस्ट लाईट ३ कोटी ५४ लक्ष ६५ हजार रूपयांचा निधी, अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पथदिव्यांसाठी २० लाखांचा निधी असे नवापूर नगर पालिकेत एकूण ७ कोटी ७४ लक्ष ६५ हजार ५७८ रूपये मंजूर करण्यात आले आहे. १०-१५ दिवसात नवापूर शहरात पथदिवे बनविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
नवापूर शहरातील अल्पसंख्यांक बहुल वस्तीत २० लाखांचा निधी पथदिव्यांसाठी सन २०२०-२०२१ च्या वर्षात मंजूर करण्यात आला आहे.राज्यातील अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम योजनेअंतर्गत नवापूर शहरातील मोठी कब्रस्थान येथे ट्युबुलर पोलवर १० लाख किंमतीचे एलईडी दिवे लावण्यात येणार आहे.तसेच इदगाह रोड येथील कब्रस्थान येथे देखील १० लाख किंमतीचे एलईडी दिवे लावण्याने कब्रस्थान परिसरातील अंधकार दुर होईल परिसर प्रकाशमान होईल. यासंदर्भात उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,नगरसेवक आरीफ बलेसरीया, हारूण खाटीक, सुरैय्या बी फारूख शाह, खलील खाटीक आदीं अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एडवोकेट के.सी पाडवी,आमदार शिरीषकुमार नाईक,नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील,यांचे आभार मानले.

पालकमंत्री व आमदारांचे आभार

नवापुर शहर प्रकाशमय करण्यासाठी नवापूर नगर पालिकेचे नगराध्यक्षासह पालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याकडे एलईडी लाईट व सोलर लाईट आदींची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आमदारांनी तात्काळ पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या मदतीने नवापूर शहराला ७ कोटी ७४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नगराध्यक्षा म्हणून मी नवापूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने आमदार शिरीषकुमार नाईक व पालकमंत्री ॲड. के. सी.पाडवी यांचे जाहीर आभार व्यक्त करतो.
हेमलता पाटील, न.पा,नगराध्यक्षा,नवापूर

बातमी शेअर करा
Previous Post

कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सहकार भारतीमुळे सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था: विश्वास ठाकूर

Next Post
सहकार भारतीमुळे  सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था: विश्वास ठाकूर

सहकार भारतीमुळे सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था: विश्वास ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add