तळोदा l प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे राज्यभरात घेतली जाणारी गांधी विचार परीक्षा जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आली. परीक्षेत एकूण 178 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परीक्षेचा नुकताच निकाल आला असून विद्यामंदिरातील माध्यमिक गटात कु.मिनल विजय चव्हाण इ.10 वी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, आदित्य सुधाकर पाटील इ.9 वी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, प्रसाद दिनेश शिंदे इ.8 वी जिल्ह्यातून तृतीय क्रमांक आला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.आय. पी. बैसाणे सरांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. निखिलभाई तुरखिया, संचालिका सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम.महाले आप्पा, सचिव संजयभाई पटेल ,समन्वयक हर्षिल तुरखिया ,प्राचार्य सुनिल परदेशी,मुख्याध्यापिका भावना डोंगरे, शिक्षक सौ.रेखा मोरे, रविंद्र गुरव,सचिन पंचभाई ,प्रा.मिलिंदकुमार पाटोळे यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.










