नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कन्साई येथील घराचे कौल खाली जमिनीवर पाडल्याच्या कारणावरुन एकास काठीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील कन्साई येथील पिंट्या काशिराम ठाकरे याने अनिल सिताराम वळवी यांच्या घराचे कौल खाली जमिनीवर पाडले. याचा राग आल्याने पिंट्या ठाकरे यांना अनिल सिताराम वळवी, तिनश्या सिताराम वळवी, भरत साहेबराव वळवी व अरुण संजय वळवी (सर्व रा.कन्साई ता.शहादा) यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत पिंट्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.काशिनाथ साळवे करीत आहेत.










