नंदुरबार | प्रतिनिधी
दहावीप्रमाणेच इयत्ता बारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्हयाचा निकाल नाशिक विभागात सर्वाधिक लागला आहे. नंदुरबार जिल्हयाचा ९९.८२ टक्के लागला. जिल्हयातील २६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ९९.८२ टक्के लागला. नाशिक विभागात सर्वाधिक निकाल नंदुरबार जिल्हयाचा लागला आहे. जिल्हयात बारावीचे एकुण १५ हजार २८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होेते. त्यापैकी १५ हजार २५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यात आठ विद्यार्थीनी व १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विज्ञान शाखेत ८ हजार ९८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत २३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून विज्ञान शाखेचा निकाल ९९.७१ टक्के लागला.
कला शाखेत ६ हजार १०० विद्यार्थी प्रविष्ठ त्यापैकी ६ हजार ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ९९.९५ टक्के लागला.
वाणिज्य शाखेत ९०६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
व्होकेशनल अभ्यासक्रमात १७८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले असून या अभ्यासक्रमाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.