Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व तळोदा शहराच्या रिंगरोडला मंजूरी, खा.हिना गवितांच्या मागणीला आले यश

team by team
April 22, 2022
in राजकीय
0
नंदुरबार व तळोदा शहराच्या रिंगरोडला मंजूरी, खा.हिना गवितांच्या मागणीला आले यश

नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीया हे उद्या दि. २३ व २४ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन होणार असल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ते केंद्राच्या विविध योजनांना भेटी देणार आहेत.
खा.डॉ.गावित म्हणाल्या, केंद्र सरकारच्यावतीने सामाजिक न्याय पकवाडा अभियान राबवण्यिात येणार असून या अभियानादरम्यान केंद्रीयमंत्री विविध जिल्ह्यांना भेट देणार आहेत. उद्या दि.२३ रोजी सकाळी ९ वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांचे नवापूरला आगमन होणार आहे. डॉ.मनसुख मांडवीया नवापूर एमआयडीसीला भेट देणार असून तेथील टेक्सटाईल फॅक्टरीच्या कॉमन सेंटरची पाहणी करणार आहेत. तसेच नंदुरबार जल्हिा रूग्णालयातील शंभर खाटांच्या महिला रूग्णालयाचे भूमीपुजन करणार आहेत. नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा उपकेंद्र येथील आयुष्यमान भारत टेली मेडीसीनची पाहणी डॉ.मांडवीया करणार असल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी दिली.
नंदुरबार व तळोदा शहराच्या रिंगरोडला मंजूरी
जिल्ह्यातील विविध रस्त्यांना शेवाळी-नंदुरबार तसेच नंदुरबार-तळोदा-अंकलेश्‍वर या रस्ते कामांना लवकरच सुरुवात होणार असुन नंदुरबार व तळोदा शहराच्या रिंग रोडला ना.नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी दिली आहे. काल ना.गडकरी यांच्या हस्ते कोळदा-खेतिया रस्त्याचेही लोकार्पण करण्यात आले.
धुळे जिल्हा दौर्‍यावर ना.नितीन गडकरी हे आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खा.डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार लोकसभा मतदार संघातील दळणवळणासाठी रस्त्यांची चांगली सुविधा निर्माण व्हावी, यासाठी गेल्या पाच वर्षापासून ना.नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. काल धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात कोळदा-खेतिया रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. तर शेवाळी-नंदुरबार रस्त्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचे ना.नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. विसरवाडी, नंदुरबार, कोळदे या राष्ट्रीय महामार्गालाही ना.नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून ५० किलो मीटर लांबीच्या या रस्त्याला ५५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रकाशा गावातील चौपदीकरणालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी दिली. नंदुरबार शहराच्या सद्यस्थितीतील बायपास व्यतिरक्ति शहराबाहेरुन रिंग रोडला मंजुरी देण्यात आली असून केंद्र सरकारच्या वार्षिक प्लॅनमध्ये डीपीआर बनवण्यिासाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हिना गावीत यांनी दिली. तळोदा शहराच्या रिंग रोडलाही लवकरच मंजुरी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोंडाईचा ते शहादा मार्गाचेही चौपदीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंकलेश्‍वर-बर्हाणणपूर महामार्गात नंदुरबार लोकसभा मतदार संघातील शिरपूर-शहादा-तळोदा-अक्कलकुवा हे चार तालुके असल्याने सदर महामार्ग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रस्तावास मंत्री नितीन गडकरींची मंजुरी

Next Post

जिल्ह्यातून तीन दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
अबब:वीज वितरण कंपनीत ६३ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द गुन्हा दाखल

जिल्ह्यातून तीन दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add