नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 21 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथून मोटारीने नाशिककडे प्रयाण.सायंकाळी 7 वाजता नाशिक येथे आगमन व राखीव. रात्री 9 वाजता नाशिक येथुन नंदुरबारकडे प्रयाण.
शुक्रवार 22 एप्रिल 2022 रोजी पहाटे 1 वाजता नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. सकाळी 10 वाजता राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत आरोग्य शिबिराचे उद्घाटन (स्थळ जिल्हा रुग्णालय,नंदुरबार ) सकाळी 11.30 वाजता संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- मा. पालकमंत्री महोदय यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगण ) दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत नंदुरबार येथे राखीव. सायंकाळी 4 वाजता जलजिवन मिशन कार्यक्रम आढावा बैठक (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार ) व सोईनुसार असली ता.धडगांवकडे प्रयाण व मुक्काम.
शनिवार 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7 वाजता बडोदा गुजरात कडे प्रयाण. रविवार 24 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता असली येथुन डाबकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता शासकीय आश्रमशाळा डाब.ता.अक्कलकुवा येथील मुलींचे वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सायंकाळी 7 वाजता डाब येथून काठी ता.अक्कलकुवाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता कु.स्नेहा जितेंद्र पाडवी, सरपंच,काठी व कु.अंकिता जितेंद्र पाडवी यांच्या विवाह समारंभास उपस्थिती. सोईनुसार असली ता.धडगांवकडे प्रयाण व मुक्काम.