Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा

team by team
April 19, 2022
in शैक्षणिक
0
कोपर्ली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा

कोपर्ली l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा कोपर्ली व उर्दू शाळा कोपर्ली यांचा संयुक्त शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याचे अध्यक्ष सरपंच विनोद वानखेडे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवनाथ सोणवणे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कुंभार, राहुल वानखेडे, लहु गायकवाड, मनोज वानखेडे, शबाना पिंजारी, केंद्रप्रमुख श्रीमती रेखा पानपाटील, मुख्याध्यापक साहेबराव अहिरराव आदी उपस्थित होते.प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.


मेळाव्याच्या आदल्या दिवशीच शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व अंगणवाडी ताईंच्या मदतीने दाखल पात्र विद्यार्थी पालक-माता यांच्या गृहभेटी घेत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात येणार आहे.याबाबत शा.व्य.स.अध्यक्ष व सदस्य, शिक्षक, सरपंच, अंगणवाडी ताई,मदतनीस, ग्रामस्थ यांच्यासह गावात प्रभातफेरी काढून ढोलताशांच्या गजरात व शैक्षणिक घोषणा देऊन दवंडी देण्यात येऊन आमंत्रित करण्यात आले. मेळाव्याच्या ठिकाणी टेबल क्रमांक 1 ते 07 सर्व माहिती सर्व मान्यवरांना देण्यात आली.शाळापूर्व तयारी मेळावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यी ,पालक यांची विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत दाखल होण्यापूर्वीपासून काय भूमिका असेल यासंदर्भात सविस्तर सखोल माहिती देण्यात आली.
मनोज वानखेडे यांनी मेळाव्यातील नियोजन मांडणी बाबत कौतुक करीत सर्व शिक्षक बांधवांचे आभार व्यक्त करीत पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
ज्ञानेश्वर कुंभार यांनी, मुलांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे शिक्षणाची गोडी लागेल, व कार्यक्रमात प्रत्येक पालकांचा सहभाग असल्याने शिक्षणाला नवी दिशा मिळेल असे सांगितले. पालक राहुल भोई यांनी शाळापूर्व तयारी मेळावा अतिशय प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल शाळा,शिक्षक, पालक यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच या मेळाव्याचे स्वरूप फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत बोलीभाषा आणि योग्य उदाहरण दाखल्यासाहित गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षांनी मेळाव्यात मार्गदर्शन करीत मेळाव्याबाबत आणि शिक्षक बांधवांच्या नियोजनाविषयी कौतुक उद्गार करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आत्माराम आढावे, सुरेश भोई, पांडुरंग गावित, रणजित गावित, श्रीमती राजश्री पाटील, श्रीमती आरती शिंदे, गणपत पाडवी, मो.इब्राहिम, सुरेश भोई यांनी परिश्रम केले.त्यांना सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व सर्व आशा स्वयंसेविका कोपर्ली यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक साहेबराव अहिरराव,मुख्याध्यापिका श्रीमती.नाजेमा पठाण यांनी केले.सूत्रसंचालन आत्माराम आढावे यांनी केले.तर आभार
श्रीमती.आरती शिंदे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन, घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

Next Post

मलोणी येथील एस.ए.मिशन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन

Next Post
मलोणी येथील एस.ए.मिशन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन

मलोणी येथील एस.ए.मिशन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add