नंदुरबार l प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समिती व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने भीम गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भीमगीत व प्रबोधनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावरील आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक दीपक दिघे, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते रसिकलाल पेंढारकर, मुख्याधिकारी अमोल बागुल, दीपक बागले, वैभव थोरात उपस्थित होते.
प्रबोधनकार संतोष जोंधळे व त्यांच्या टीमने भीम गीते सादर केले. ‘एक से बढकर एक’ गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन जीवन चरित्र विषयी कार्याला उजाळा देण्यात आला. अनेक महिला, पुरुषांनी गीतांवर ताल धरत जल्लोष केला. उत्कृष्ट गायन व सुरेख संगीताच्या अविष्कारमुळे कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी मच्छिंद्र गुलाले, प्रमोद मोरे, राजेंद्र बोराळे, सिद्धार्थ पवार, विजय वाघ, राहुल अडकमोल, कैलास पेंढारकर, दीपक भालेराव, आप्पा वाघ, रविकांत बागले, अशोक मोरे, कैलास घोडसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालननागसेन पेंढारकर यांनी केले.