नंदुरबार l प्रतिनिधी
येथील दंडपाणेश्वर मंदिराच्या प्रांगणात श्री.संप्रदायाचा महिला अध्यात्मिक मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी साधना शिंदे, नगरसेविका मंगलाबाई माळी, भारती राजपूत ,मोहितसिंग राजपूत, नाशिकच्या महिला निरीक्षक अलका खर्डे, जिल्हा महिला अध्यक्ष राजश्री भावसार, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कोकणी, प्रवचनकार भूषण सूर्यकांत महाराज आदी उपस्थित होते. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रेरीत श्री.संप्रदायाचा नंदुरबार जिल्ह्याचा महिला अध्यात्मिक मेळावा अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी साधना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.सुरुवातीस मोहितसिंग राजपूत यांच्या हस्ते सपत्नीक जगद्गुरु नरेंद्राचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मेळाव्यात मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी महिलांनी घराबाहेर पडले पाहिजे व समाजाचे नेतृत्व केले पाहिजे असे सांगितले.तर साधना शिंदे यांनी अध्यात्म,विज्ञान, व व्यवहार यांचे जीवनातील महत्त्व सांगून भक्ती हा मनाचा व्यायाम असून त्यामुळे मन संयमित व खंबीर बनते. संस्कारक्षम महिलाच कुटुंबावर संस्कार करू शकते. अध्यात्म आपणास जीवन जगायचे कसे हे शिकवते म्हणून लौकिक शिक्षणाला जशी शिक्षकाची गरज असते तशी अध्यात्मिक शिक्षणाला अध्यात्मिक सद्गुरु ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महीला मेळाव्यात आदिवासी महिलांनी पावरा व कोळी नृत्य सादर केले.तर माधुरी कलाल यांनी भक्ती गीत सादर केले. तसेच भूमि सोनवणे, रिद्धी महाजन ,राजश्री भावसार, सुनिता सोनवणे, भारती सोनार, शितल देसले, व शशिकला तलवारे, भूमिका अहिरे, भूमी सोनवणे यांनी अंबाबाईचा जोगवा हे नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिकच्या महिला निरीक्षक अलका खर्डे यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री साळवे व आभार राजश्री भावसार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव प्रमोद भावसार, नंदुरबार तालुका अध्यक्ष कांतीलाल पवार, शहादा तालुका अध्यक्ष दुर्योधन वळवी ,नवापूर तालुका अध्यक्ष अनिल बागुल, नवापूर तालुका महिला प्रमुख सुधीराबाई कोकणी, शहादा तालुका महिला प्रमुख अनिताबाई वळवी, मनोज सुळे, सुनील कोकणी, जितेंद्र कोकणी ,लक्ष्मण मराठे, नीलिमा बोरसे, दर्शना बोरसे, यांनी परिश्रम घेतले.