म्हसावद l प्रतिनिधी
शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा फायदा घ्या.यासाठी आदिवासी वसतिगृह छात्रालये मोफत प्रवेश आहे. शिक्षण झाले आपली पिढी बरबाद होणार यासाठी पालकांनी काळजी घ्या.आपल्या मुलांना शाळेत पाठवा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
शहादा तालुक्यातील उभादगड येथील स्थानिक विकास निधीतून समाज मंदिर येथील हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खा. डॉ.हिना गावित, माजी मंत्री आ. डॉ विजयकुमार गावीत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, जिल्हा परिषदेचे सदस्य मोहन शेवाळे , समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, मंदाने उपसरपंच अनिल भामरे, भरत नगराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रभाकर वळवी, शाखा अभियंता एस. वाय. पगार, कनिष्ठ अभियंता जे. एस.कांडेकर, ह. भ.प.सुनिल जोशी आदी उपस्थित होते.
खा. डॉ.हिना गावित म्हणाल्या की, केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली जल जीवन मिशन या अंतर्गत हर घर नल से जल या योजनेअंतर्गत प्रत्येकाला घरापर्यंत शुद्ध पाणी पोचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभी राहील महिला स्वावलंबी जीवन जगेल यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध वस्तू तयार करून ती देश-विदेशात विक्रीस गेले पाहिजे. यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच तसेच अद्यापही बहुतांशी आदिवासी बांधव कुडाच्या झोपडीत राहतात यासाठी येत्या दोन वर्षात प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकाला घर मिळेल यावर्षी जनगणना सर्वेक्षण करताना प्रत्येकाने आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे नाव आले पाहिजे कोणाचे नाव सुटता कामा नये जर यदा कदाचित नाव सुटले तर पुढील दहा वर्षापर्यंत परिवाराला शासन शासकीय योजनेचा कुठलाही लाभ घेता येणार नाही यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी केले.सूत्रसंचालन मन्मथ बरडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामसिंग भिल, सखाराम सोनवणे, विष्णू सोनवणे, रविंद्र सोनवणे, आप्पा राठोड आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.