नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा ते वडखुंट दरम्यान 29 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या बाजुला स्त्री जातीचे नवजात बाळ पोलिसांना आढळून आले आहे. सदर बालक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016) चाईल्ड लाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार ( 02564-210047 ) वर संपर्क साधुन सदर बाळांस 10 दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे. अन्यथा सदर बाळांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नंदुरबार यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.








