नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी कष्टकरी शेतकरी जनतेच्या जल जंगल जमीन अधिकार यांच्या संघर्षात 50 वर्षं यशस्वी लढा व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्यशोधक शेतकरी सभा व शेतकरी ग्रामीण कष्टकरी सभेचे महाराष्ट्रचे अध्यक्ष रामसिंग गावित यांच्या जाहीर कृतज्ञता नागरी सत्कार करण्यात आला . सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने कृतज्ञता जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोत्तम शर्मा यांच्या हस्ते हा जाहीर सत्कार करण्यात आला .यावेळी किशोर ढमाले ,साजूबाई गावित , वनजीभाऊ गायकवाड ,करणसिंग कोकणी ,रणजीत गावित विक्रम गावित, मंग्या गावित जालमसिंग गावित , लिलाबाई वळवी ,सिंगा वळवी ,शांताबाई गावित, शीतल गावित ,जमुनाबाई ठाकरे ,पुरुषोत्तम शर्मा ,आर टी गावित ,दिलीप गावित व धुळे-नंदुरबार सह महाराष्ट्रातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय महासचिव पुरुषोत्तम शर्मा यांनी बोलताना सांगितले की, आदिवासी न्याय हक्कासाठी लढणारे रामसिंग गावित त्यांच्यासारखे योद्धा फार कमी प्रमाणात असतात ते फक्त सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा ,सत्यशोधक कष्टकरी सभा ,शेतकरी यांचे नेते नसून संपूर्ण भारताचे नेते आहेत .त्यांनी जी लढाई सुरू केली आहे ती लढाई जल जमीन निसर्ग याच्यासाठी आहे. काही उद्योग पतीनी निसर्गाने दिलेल्या वस्तूत हस्तक्षेप करून त्या हडप केल्या आहेत पण त्या विरोधात जेव्हाही आंदोलन पुकारण्यात आले तेव्हा रामसिंग गावित यांचा मोलाचा सहभाग होता . किशोर ढमाले यांनी प्रास्ताविकात सांगितले की गेले 50 वर्ष या चळवळीत कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी दापुर ते दिल्ली पर्यंत उपोषण, सत्याग्रह, आंदोलन करण्यात रामसिंग गावित यांचे मोलाचे योगदान होते. पेसा कायदा साठी दिल्लीच्या उपोषनात त्याचा मोठा सहभाग होता . अनेक प्रश्नासाठी रामसिंग गावित यांनी यशस्वी लढा दिला आहे. असे किशोर ढमाले यांनी सांगितले. या कृतज्ञता सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणजीत गावित यांनी केले .








