नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओके या निवासस्थानी दुपारी एसटी आंदोलकांनी अचानक जावून हल्ला केला त्याच्या निषेधार्थ नंदूरबार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खापर ता.अक्कलकुवा येथे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.

देशाचे जेष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या सिल्वर ओक या रहात्या घरावर काही लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे भरकटलेल्या लोकांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी खापर ता.अक्कलकुवा येथे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष रायसिंग वळवी,नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,रविंद्र वळवी,विधानसभा प्रभारी संगिता पाडवी,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड.अश्विनी जोशी, सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, चित्रपट विभाग जिल्हाध्यक्ष राजु पाटील,सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड.रुपसिग वसावे, ओबीसी जिल्हा समन्वयक निलेश चौधरी,महिला जिल्हा चिटणीस हंसा अहिरे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष नर्गिस मक्राणी आदी पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.








