नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद नंदुरबार तालुका विधायक समिती वैभव माध्यमिक विद्यालय वैजाली येथे गटशिक्षणाधिकारी डी.टी वळवी, एस.एस तावडे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
शिक्षण परिषदेचे सुरुवात सरस्वती माता प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर होते ,वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे, पदोन्नती मुख्याध्यापक सुदाम पाटील, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, साने गुरुजी मित्र मंडळ शहादाचे अध्यक्ष माणक चौधरी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक इ.उपस्थित होते. शिक्षण परिषद मध्ये खालीलप्रमाणे तासिकावार चर्चा झाली. शिक्षणपरिषद मागोवा फेब्रुवारी केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या पीपीटी द्वारे मागील फेब्रुवारी शिक्षण परिषद मागोवा घेतला. केंद्र कार्यक्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केंद्रातील शिक्षिकांचा सन्मान प्रमाणपत्र व पेन, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यासाठी सानेगुरुजी मित्र मंडळ शहादा यांचे सहकार्य लाभले.प्रकाशा केंद्रातील केंद्रशाळा, कन्याशाळा, वैजाली शाळा व सर्वोदय माध्य. विद्यालय, प्रकाशा यांनी श्रमकरी, कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करून प्रकाशा केंद्राचे नाव जिल्ह्य़ात उंचावले. या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती केंद्रशाळेतील शिक्षिका संगीता राणे यांनी सांगितली. मुख्या. चंद्रशेखर लोखंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा साधावा. गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य वापरून आनंददायी शिक्षण देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. कलेतून शिक्षण घेऊया व्हिडिओ व डाएटच्या पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. सखी सावित्री समिती गठन अनुराधा गव्हाणे यांनी सखी सावित्री समिती गठण याविषयी मार्गदर्शन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन किशोर महाले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन याबाबत परिपत्रकाचे वाचन करून याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. केंद्रस्तरीय विषय केंद्रातील गरजा निहाय उपक्रम यामध्ये शाळेतील प्रत्येक मूल महत्वाचे असून ते शिकले पाहिजे त्यासाठी काय नियोजन करता येऊ शकते याबाबत रामलाल पारधी व रवींद्र पाटील यांनी त्या संदर्भात राबवले जात असलेल्या उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले .प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी चर्चेत विशेष सहभाग घेतला.उषा पाटील यांनी विशेष सहभाग नोंदविला. विद्यार्थी उपस्थिती बाबत प्रशांत भामरे सर यांनी उपस्थिती समस्या व त्या कशा प्रकारे सोडविता येतील याबाबतीत सादरीकरण केले. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती धनंजय पाटील सर यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती संतोष कुवर यांनी शासन निर्णय व इतिवृत्त लिहिणे बाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशासकीय कार्य व समारोप केंद्रप्रमुख यांनी सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंद घेतली.व शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, शाळापूर्व तयारी, सीसीई रेकॉर्ड,संचमान्यता,गुणवत्ता आदींबाबत मार्गदर्शन केले ,शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी वैभव विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी योगदान देऊन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षण परिषदेचे सुत्रसंचलन जी.पी.पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार वैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे यांनी मानले.








