Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बहुरूपा शिवारात १० दिवसाचे बिबट्याचे बछडे आढळले

team by team
April 9, 2022
in कृषी
0
बहुरूपा शिवारात १० दिवसाचे बिबट्याचे बछडे आढळले

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बहुरूपा शिवारात १० दिवसाचे बिबट्याचे बछडे आढळले.दरम्यान वनविभागाकडे पुरेश्या सोय सुविधा नसल्यामुळे वनविभागाने त्यास ट्रॅप कॅमेरे लावून त्याच शेतात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तळोदा तालुक्यात शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतकरी व शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून चिनोदा, रांझणी, रोझवा या भागात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. चिनोदा, रांझणी, रोझवा शिवारात बिबट्याने वराह, श्वान, गायीचे वासरू, शेळ्या फस्त केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बहुरुपा येथील शेत शिवारात गिरधर पटेल यांच्या शेतात भर दिवसा दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिबट्याचे १० दिवसाचे बछडे मुक्त संचार करताना शेतमालक याना दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती लागलीच वनविभागाला कळविली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटणास्थळी भेट दिली. यावेळी मानव वनजिव रक्षकचे सागर निकुंभ, दिनेश कोळी, हेमंत चौधरी, गुजरात व महाराष्ट्रा वनविभागाचे कर्मचाऱ्यानी परिस्थीती जाणून घेतली. दरम्यान यापूर्वी देखील अश्याच पद्धतीने तालुक्यात ठिकठिकाणी बछडे आढलून आले होते. दरम्यान वनविभागाकडे त्यांच्या निगा राखण्यासाठी पुरेसा सुविधा नसल्याने त्या बछड्यांना बोरेवली नॅशनल पार्क येथे रवाना करण्यात आले होते. मागील परिस्थितीचा अनुभव घेता व रात्रीची सुमारास मादी बिबट येवून त्या बछड्यास घेवून जाईल या आशेवर वनविभागाने त्या ठिकाणी 2 ट्रॅप कॅमेरे लावले असून आढळलेले बछड्यास ताब्यात न घेता त्याच शेतात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा मिळतो लाभ: एटीएम कार्ड धारक असलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू, प्रत्येकी दोन लाखाचा अपघात विमा धनादेश वारसास प्रदान

Next Post

रोप लावुन केले अस्थी विसर्जन,आदर्श शिक्षकांच्या मुलांचा आदर्श उपक्रम

Next Post
रोप लावुन केले अस्थी विसर्जन,आदर्श शिक्षकांच्या मुलांचा आदर्श उपक्रम

रोप लावुन केले अस्थी विसर्जन,आदर्श शिक्षकांच्या मुलांचा आदर्श उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add