नंदुरबार ! प्रतिनिधी
एसईऊंडेशन आणि सीवायडीए संस्थेतर्फे जिल्ह्यासाठी 50 फाऊलर बेड भेट देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात हे बेड जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते, सीवायडीएचे सचिव मॅथ्यु मट्टम, समन्वयक अमोल शेवाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी सीवायडीएला धन्यवाद देताना ग्रामीण भागात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेकडून चांगले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. फाऊलर बेडचा उपयोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी चांगल्यारितीने होईल असे ते म्हणाले.
श्री.गावडे यांनी सीवायडीएतर्फे जिल्ह्यात स्वच्छता आणि आरोग्यासंदर्भात चांगले काम होत असल्याचे सांगितले. कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नात संस्थेने देऊ केलेले सहकार्य स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.मॅथ्यु यांनी नंदुरबार जिल्ह्यात संस्थेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सॅम आणि मॅम बालक असलेल्या 2000 कुटुंबांना पोषण आहाराचे कीट वितरीत करण्यासोबत ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीचे नियोजन संस्थेतर्फे करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.