म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवाच्या पाश्वभूमीवर ट्रैकिंग पोलिस फोर्सचे पथ संचलन करण्यात आले.
म्हसावद पोलिसांनी राम नवमी,क्रांतिज्योति महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती च्या पाश्चभुमीवर व नियोजन म्हणून म्हसावद गावात पोलिस अधीक्षक पी,आर.पाटील,शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने म्हसावद पोलिस,शहादा आर.सी.पी. यांनी पथ संचलन करण्यात आले.पोलिस निरीक्षक निवृत्ति पवार,पोलीस उपनिरीक्षक सुनिल बि-हाडे
यांच्यासह पोलिस कर्मचारी म्हसावद गावातील मुख्य बाजारपेठ,अहिल्याबाई चौक,कुबेर हायस्कूल च परिसर,तोरणमाळ फ़ात्या आदि ठिकाणी व गर्दी असलेल्या ठिकाणी पथ संचलन करण्यात आले.ग्रामीण भाग व सातपुद्याच्या पायथ्याशी असल्याने नागरिक है संचलन पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.