नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील तऱ्हाडी येथील आकाश संतोष पारधी (वय २५) हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एल ६७७२) तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्याने जात होते. यावेळी हेमराज छोटूलाल पाटील (रा.तऱ्हाडी ता.शहादा) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर यू-टर्न घेत असतांना वळविल्याने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात आकाश पारधी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सुनंदाबाई संतोष पारधी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात हेमराज पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.वळवी करीत आहेत.