नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात मंदिरा जवळ लोखंडी पाईप घेवुन जाणारा ट्रालाचे पाईप नादुरुस्त झाल्याने ,ट्राला मागच्या दिशेने येत असताना रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने सकाळी 9 वाजे पासुन ,रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे 5 तास वाहतूक ठप्प झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोंडाईबारी घाटात दोन ट्राले लोखंडी पाईप घेवून जात होते घाटात मंदिरा जवळ महामार्ग चे काम जोमात सुरू आहे ,याठिकाणी संपूर्ण रस्त्यावर खडी मुरुम पडले , धिमी गतीने पुढे चालत असलेल्या ट्राला चा पाईप तुटल्याने ट्राला ,उतार वरुण माघच्या दिशे ,येत असताना ,रस्त्याच्या मधोमध आडवा झाला घाटात काम सुरु असल्याने ,ट्राला निघण्यास जागा नसल्याने ,रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली, दोघे बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या ,गुजरात राज्यात, तसेच नासीक,जळगाव, धुळे, जाणाऱ्या येणाऱ्या एस.टी.महामंडळाच्या बसेस वाहतूक मध्ये अडकून पडले होते ,या घटनेची माहिती कोंडाईबारी घाट वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक काझी यांना मिळताच , ए.एस.आय.वाघ,रामजी गावीत,भुषण बागुल,सुनील चौधरी, घटनास्थळी दाखल झाले, ट्रालाची परिस्थिती बघता ,दोन क्रेनच्या सहाय्याने, तब्बल चार तास अथक परिश्रम घेवुन ,ट्राला रस्त्याच्या कडेला लावुन वाहतूक सुरळीत करण्यात आली, घाटात वाहतूक ठप्प झाल्याने एस.टी.बस ,लक्झरी मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचीचे गैरसोय होवून मोठे हाल झाले होते.








