अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारात पाणपोई लावली असून त्याचे उद्घाटन
पोलीस उप अधिक्षक संभाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.


दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अक्कलकुवा येथे शासकीय कार्यालयात कामाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण होत असल्याने नागरिकांची गैर सोय दूर करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात पाणपोई लाऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या पाणपोईचे उदघाटन पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्दीन पठाण ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर ,जि प सदस्य प्रताप वसावे, आरिफ मक्राणी ,सामाजिक कार्यकर्ते तसेच अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.









