धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुकलट पाडा येथे कोरड्या नाल्यातून झरा पाझरु लागल्याची माहिती सुभाष पावरा यांनी दिली. ते बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी लोटत आहे. अशा घटनांमुळे अंधश्रद्धा वाढिस लागतात व माणसं दैववादी होऊन, प्रयत्नवादी राहत नाहीत म्हणून अशा उचित श्रमप्रतिष्ठेला अधोरेखित करणार्या घटना शास्रशुध्द माहितीसहीत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन जलसाक्षरता समितीचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील यांनी सांगितले.


जागतिक जल दिना निमित्त साधुन शिवलाल मिठ्या पावरा यांच्या हस्ते करण्यात जल पुजन आले. याप्रसंगी माजी सरपंच शिवलाल पावरा, तोताराम पावरा,कुत्र्या पावरा.,जेलसिंग पावरा,गोट्या पावरा,प्रताप पावरा,अनिल पावरा,सरपसिंग पावरा,तुंबड्या पावरा, खंड्या मान्या पावरा, नारसिंग पावरा आदि उपस्थित होते.
केवळ नालाच नव्हे तर तेथील दोन विहीरींनाही पाणी आले आहे.होळीच्या पार्श्वभुमीवर उपवास सुरु असल्यामुळे होळी मातेची कृपा झाल्याचे प्रथमदर्शी नागरिकांना वाटले.
पण जलसाक्षरता समितीचे ने तेथे भेट देवुन जलसंधारणामुळे हे घडल्याचे लोकांना लक्षात आणुन दिल्यावर या वर्षी श्रमदानातुन जलसंधारणाचा निश्चय लोकांनी बोलुन दाखविला.









