शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहाद्याची विद्यार्थिनी कु.प्रणाली प्रमोद पटेल हीची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ (महिला) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत बुद्धिबळ मुलींच्या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली आहे. ह्या वर्षी बुद्धिबळ (महिला) आंतरविद्यापीठ स्पर्धा ए.यु.आर.ओ. विद्यापीठ, सुरत (गुजरात) येथे दिनांक 9 ते 13 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. ह्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ (महिला) स्पर्धेसाठी कु. प्रणाली पटेल हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघात निवड झाली असून ती विद्यापीठाच्या संघाकडून खेळणार असून प्रतिनिधित्व करणार आहे. कु.प्रणाली पटेल ही सध्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून या आधी ही प्रथम वर्षात शिक्षण घेत असतांना ही तिने बुद्धिबळ खेळात उत्तम कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड झाली होती आणि महाविद्यालयाचे नावलौकिक केले होते. 2021 -22 शैक्षणिक वर्षात बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून तिने विद्यापिठाच्या संघात आपले स्थान कायम ठेवून महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. तिच्या ह्या निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी अभिनंदन केले. कु. प्रणाली पटेल हिला महाविद्यालयाचे क्रीड़ा विभाग प्रमुख प्रा.हितेंद्र चौधरी यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. तिच्या ह्या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.