शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने युवतीसभा अंतर्गत युवतींसाठी एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य सौ.कंचनबेन पाटील, प्रमुख अतिथी सौ.यामिनीताई पाटील, जळगाव येथील आपण फाउंडेशनचे संस्थापक व वक्ते मनोज अशोक गोविंदवार, शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.मिनाक्षी संजय चौधरी, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॉं सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यशाळा ही युवतींसाठी आयोजन करण्यात आली होती. यावेळी पहिल्या सत्रात मनोज गोविंदवार यांनी संबोधित करतांना सांगितले की, माणसाचा व्यक्तिमत्व विकास कसा व्हावा व विकसित व्यक्तिमत्व कसे असावे यावर भर दिला. यामध्ये विद्यार्थिनींनी नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार कायम ठेवावा. माणसाला नेहमीच नकारात्मक विचार अडथळा निर्माण करतात तसेच व्यक्तिमत्व घडविण्यासाठी बोलतांना नेहमीच योग्य शब्दांचा वापर करावा व त्याचा योग्य अर्थ असावा. व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वप्रथम आत्मविश्वास संपादन करावा आणि स्वतःला ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. व्यक्तीचा एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे, त्यात प्रामुख्याने चार गोष्टींचा नेहमीच लक्षात असावे त्यामध्ये माणसाने एकमेकांचा आदर सन्मान केला पाहिजे. व्यक्तिमत्व विकासासाठी आत्मविश्वास, संघर्ष, संयम खुप महत्वाचा असून त्यामुळे माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो. वाचन हे माणसाचा व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो. वाचनमुळेच माणसाची प्रगती होते व घर परिवार ही सुखी राहते. आयुष्य जगण्यासाठी तीन प्रमुख गोष्टी आहेत त्यात जग समजून घेणे, स्वतःला समजून घेणे आणि आपल्याला काय करायचे आहे ते समजून घेणे. दुसर्या सत्रात प्रा.मिनाक्षी चौधरी यांनी सांगितले की, मुलाखती देतांना सर्वप्रथम आत्मविश्वास असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे आयुष्यात आपल्याला जे काही साध्य करायचे असेल आणि ध्येय असेल त्यावर लक्ष केंद्रित करून त्यावर काम करावे. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा असून वेळेच नियोजन असावे. व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी स्वतःची तयारी असणे गरजेचे आहे व ह्या कार्यशाळेमधून जे काही ज्ञान विद्यार्थ्यांनीनी घेतले आहे ते प्रत्यक्षात अनुकरण केले पाहिजे. सदर कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ह्या एक दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व युवतीसभा प्रमुख प्रा.प्राची दुसाणे यांनी केले तर आभार प्रा.सुलभा पाटील यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ हेमंत सूर्यवंशी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.रोशन चौधरी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.