Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरणने नवापूर पालिकेचे वीज कनेक्शन केले खंडीत तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय केले सिल

team by team
March 25, 2022
in राज्य
0
महावितरणने नवापूर पालिकेचे वीज कनेक्शन केले खंडीत तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय केले सिल

नवापूर | प्रतिनिधी
येथील नगरपालिकेची महावितरणकडे २३ लाखांची थकबाकी आहे तर महावितरणची नगरपालिकेकडे ३३ लाखांची थकबाकी आहे. या दोन्ही यंत्रणांनी आपापल्या अधिकाराचा वापर करुन महावितरणने पालिकेचे वीज कनेक्शन खंडीत केले आहे तर नगरपालिकेने महावितरणचे कार्यालय सिल केले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच चर्चा सुरु आहे.

मार्च महिना अखेर असल्याने सर्वच शासकीय कार्यालयांनी वसुलीसाठी कंबर कसली आहे. थकबाकीसाठी नेहमी ग्राहकांकडे तगादा लावणार्‍या कार्यालयाची थकबाकी बघून डोळे पांढरे होतील अशी स्थिती आहे.
महावितरण कंपनीचे पालिकेकडे पथदिवे आणि पाणी पुरवठा कार्यालयाचे ३३ लाख रुपयांचे बिल थकले आहे. थकबाकी असल्याने महावितरण कंपनीने नगर परिषदेचे कार्यालय व पथदिव्यांचे वीज कनेक्शन कट केले आहे.त्याचा राग आल्याने आज नगर परिषदेने ही वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे नगर परिषदेची १९९२ पासून २३ लाखांची थकबाकी असल्याने महाविज वितरण कंपनीचे कार्यालय सील केले.
यावेळी नवापूर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, सतिष बागुल, पाणी पुरवठा अधिकारी सचिन अग्रवाल, अभियंता संदानशिव, रमेश सोनार, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तसेच विज अभियंता हेमंत बनसोड व वीज कर्मचारी उपस्थित होते.

नगरपालिकेने केलेली कारवाई चुकीची
सार्वजनिक पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईट यांची नगरपालिकेची थकबाकी ३२ लाखावर आहे. याबाबत नगर पालिकेला संपर्क केला असता जे काही पोल, डिपी शिवारात उभे आहेत. त्यांचे पण चार्जेस लावलेले होते. त्यांना आम्ही सन ९२ व २०१८ चे दोन्ही जीआर दिले आहेत. त्यांनी थकबाकी दिली नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी जाऊन वीजपुरवठा खंडीत केला आहे. नगरपालिकेनेही आमचे वीज वितरण कार्यालयाचे ऑफिस सील केले आहे. परंतु आम्ही पोल डिपी यांचा खर्च वगळता सर्व थकबाकी भरणा केलेली आहे. तरी नगर पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. नगर पालिकेने आमची थकबाकी त्वरीत भरावी.
– हेमंत बनसोड, अभियंता, वीज वितरण कंपनी नवापूर

थकबाकीदारांनी आपली थकबाकी त्वरित भरावी
नवापूर वीज वितरण कंपनीकडे नगरपालिकेची थकबाकी २३ लाख असल्याने पाठपुरावा करुनदेखील त्यांनी भरणा न केल्याने वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे त्या स्थितीत सील करण्यात आले आहे. शहरातील नागरीकांकडे नगर पालिकेची थकबाकी असेल त्यांनी त्वरित थकबाकी भरुन नगर पालिकेस सहकार्य करावे. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील.

– अनिल सोनार, प्रशासकीय अधिकारी नवापूर नगर पालिका

बातमी शेअर करा
Previous Post

अतिदुर्गम भागात आठवीच्या विद्यार्थ्याने सुचविला ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय, बालविज्ञान परिषदेत श्रीराम क्लासच्या प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर

Next Post

राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add