Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

team by team
March 25, 2022
in सामाजिक
0
ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने शहरातील धुळे चौफुलीवरील हजरत अबुल गाझी दर्ग्याजवळ विनामुल्य पाणपोई सुरु करण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्र झळा पाहता तहानलेल्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई सुरु करुन सेवा केली जात असल्याने नागरीकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
नंदुरबार शहरातील ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणुन पाणपोई सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरातील हिंदु-मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत अबुल गाझी दर्ग्यावर नेहमी भाविक येतात. तसेच धुळे चौफुली हा परिसर वर्दळीचा असल्याने नेहमी प्रवासी व नागरीकांची ये-जा सुरु असते. सध्या उन्हाळा ऋतुला सुरुवात झाल्याने दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांमुळे जिवाची लाहीलाही होत असते. अशावेळी अनेकांना तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते. हीच बाब ओळखुन दरवर्षाप्रमाणे यंदाही शहरातील धुळे चौफुलीवरील हजरत अबुल गाझी दर्ग्याजवळ ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव हाजी असलम चौधरी, हाजी फारुख खाटीक, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस नासिर इब्राहीम बागवान, सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष शाकीर जाबीर बागवान, शौकत धोबी, पोकॉ.योगेश जाधव, पोकॉ.महेंद्र ठाकूर, अल्ताफ बागवान, फैय्याजोद्दीन काझी, पटेल मुझावर, सैय्यद जफर, आरिफ पठाण, रशिद मिर्झा, रफिक मिर्झा, सुलेमान मन्सुरी, बशिर शहा आदी उपस्थित होते. आरोग्यासाठी मटक्याचे पाणी अमृत असल्याचा संदेश पाणपोईतून देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान

Next Post

अतिदुर्गम भागात आठवीच्या विद्यार्थ्याने सुचविला ड्रोन ॲम्बूलन्सचा पर्याय, बालविज्ञान परिषदेत श्रीराम क्लासच्या प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add