नंदुरबार | प्रतिनिधी
कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असला की मोठा लवा जमा पाहायला मिळतो.त्याठिकाणी नागरिकांना आवडो अथवा न आवडो स्वागत, सत्कार समारंभ आयोजित केला जातो.मात्र याला अपवाद राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा ठरत आहे.कुठलाही बडेजाव नाही.गावकऱ्यांकडून सत्कार न स्वीकारता गावकऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे.तर यात्रेच्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे स्वतः नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या कागदावर टिपत असल्याने सर्वत्र राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रेची सर्वत्र चर्चा सुरू असून याचे कौतुक करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटात दि.२३ मार्च ते २५ मार्च राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक गटातील राष्ट्रवादीचे जुने तसेच नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. या परिसरातील समस्या असो अथवा विविध विकास कामे असू किंवा नियोजीत विकास कामे असो या संदर्भात परिसरातील कार्यकर्ते नागरीक यांच्या समस्या या यात्रेच्या माध्यमातून सोडविण्यात प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा २३ मार्च रोजी खोंडामळी गट, कोपर्ली गट,२४ मार्च रोजी रनाळा,मांडळ गट येथे संपन्न झाली.या यात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्त पने स्वागत केले.
दरम्यान कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असला की मोठा लवा जमा पाहायला मिळतो.त्याठिकाणी नागरिकांना आवडो अथवा न आवडो स्वागत, सत्कार समारंभ आयोजित केला जातो.मात्र याला अपवाद राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा ठरत आहे.याठिकाणी गावकऱ्याकडून पदाधिकारी कुठलाही सत्कार न स्वीकारता या ठिकाणी गावकऱ्यांचे सत्कार करण्यात येतात.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे स्वतः नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या कागदावर लिहून घेताना दिसत आहेत.तर प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेत आपुलकीने विचारपूस करीत आहेत.राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा नावाप्रमाणेच नागरिकांमध्ये स्नेह निर्माण करण्याचे काम करीत आहे.यावेळी नंदूरबार शहर प्रमुख नितीन जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आष्टे, नांदर्खे गट दि.२५ मार्च, पातोंडा, कोळदा गट दि.२६ मार्च, धानोरा, कोठली गट दि.२९ मार्च या पध्दतीने राष्ट्रवादी स्नेहमिलन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.